काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमदपटेल (Ahmed Patel Passes Away) यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. पटेल यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahu Gandhi) यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Ahmed Patel Lived And Breathed Congress, Rahul Gandhi Pays Tribute)
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते.