चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख (वय 21) हे श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे पावणे दोन वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठा बटालियन या तुकडीत त्यांचा समावेश झाला होता. श्रीनगर जवळील शरीफाबाद येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 27 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांना वीरमरण आले. याबाबत शहीद जवान यश देशमुख यांच्या वडिलांना 4.30 वाजता श्रीनगर येथून माहिती देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.यश हे सप्टेंबर महिन्यात गावी येऊन गेले होते ती त्यांची घरच्यांबरोबर झालेली शेवटची भेट ठरली. वडील दिगंबर देशमुख हे शेती करतात. त्यांना बहिण (विवाहित) व भाऊ आहे. कर्ता पुरुष गेल्याने घरच्या मंडळींनी एकच आक्रोश केला आहे. त्यांचे पार्थिव 28 च्या रात्री किंवा दि. 29 दुपारपर्यंत येणार असल्याची माहिती आहे.
SEJAL MEDIA NEWS
https://sejalmedianetwork.com/category/trending-news/