• Thu. Apr 15th, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (दि.२७) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी त्यांची तब्बेत अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तब्बेतीमध्ये सुधारणा न होता ती अधिक बिघडत गेली आणि अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झ्रुंज थांबली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी रुबी रुग्णालयाला भेट देऊन आमदार भालके यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारनंतर कोरोनामुक्त होऊन ते घरीही परतले होते. मात्र त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शुक्रवारी दुपारी ४ नंतर त्यांची तब्बेत अधिक बिघल्याने त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवल्याची माहिती रुबी रुग्णालयाचे डॉ. ग्रांट यांनी दिली होती. दरम्यान ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृती विषयी विचारणा केली होती.
शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार भालके यांची तब्बेत चिंताजनक असल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रुबी रुग्णालाच्या परिसरात जमू लागल्या होत्या. सर्वच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या नेत्याच्या तब्बेती विषयची चिंता स्पष्ट दिसू लागली होती. कार्यकर्त्यांचा जमाव रुग्णालय परिसरात वाढू लागल्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बाहेर येत भालके यांच्या तब्बेतेची व डॉक्टर करत असेलेल्या प्रयत्नांची माहिती कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर सर्वच कार्यकर्ते आपला नेता लवकरात लवकर बरा व्हावा हिच प्रार्थना करत होते. परंतु काळाला हे मान्य नव्हते, अखेर मध्यरात्री आमदार भारत भालके याची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.या वृत्तानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. भालके यांच्या मतदारसंघात ही माहिती समजताच पंढरपूर, मंगळवेढासह आसपासचा परिसर दु:खाच्या सागरात बुडाला. आमदार भारत भालके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (दि.२७) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.

SEJAL MEDIA NEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Hello,
Can we Help You ☺️