मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी सुद्धा ‘लॉकडाउन लावण्याची परत वेळ येऊ देऊ नका’ असं आवाहन केले आहे. पण लॉकडाउन 2.0 ची तलवार ही मात्र कायम आहे.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन लागणार अशी चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांनी या बद्दल शक्यता वर्तवली आहे. पण, वैद्यकीय क्षेत्रातून याला विरोध होत आहे. फक्त धास्ती आहे म्हणून लॉकडाउन लावणे योग्य नाही, असं ठाम मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.