झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले सर्वांचे लाडके अजिंक्य आणि शितल म्हणजेच नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांना आपण ह्या मालिकेनंतर एका नव्या रूपात, नव्या रोमॅंटिक गण्यामध्ये पाहिलं होतं. दोघांचही ते पहिलचं गाणं होत. ‘खुळाच झालो गं’ असं त्या गाण्याचं नाव. ह्या गाण्यात उर्वी आणि मल्हार असं त्यांच्या व्यक्तिरेखेंच नाव होत. त्यांच्या त्या गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
आता पुन्हा ही जोडी एका दुसऱ्या गाण्यात लवकरच दिसणार आहे. ह्या गण्याचं नाव ‘चाहूल’ असं आहे. ह्या गाण्याचं दिग्दर्शन ओमकार माने यांनी केल असून हे गाणं १ डिसेंबरला रिलीज झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एव्हिप्रॉडक्शनफिल्मस ह्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट टाकून ऑफीशियल अनाउनसमेंट ऑफ अवर न्यू सॉन्ग चाहूल असं कॅप्शन दिल आहे. ह्यावर दोघांच्याही चाहत्यांनी आम्ही ह्या गाण्याची वाट पाहतोय आणि खुप उत्साही ही आहोत अश्या कॉमेंट्स केल्या आहेत.
https://instagram.com/shivanibaokar?igshid=w35nnnj01pj6
more Entertainment news – https://sejalmedianetwork.com/category/entertainment/