• Mon. Jan 25th, 2021

YouTube चॅनल सुरु करा अन् करा घरबसल्या ‘कमाई’, जाणून घ्या प्रक्रिया

Youtube वरुन घसबसल्या कमाई करण्याची पहिली पायरी चॅनल सुरू करणे आहे पण त्यापूर्वी आपल्याला Youtube प्रोगामशी जोडण्यासाठी त्याच्या पॉलिसी आणि गाईडलाईन्स मान्य कराव्या लागतील. चॅनलवर तोच प्रोगाम घेतला जाईल, जो अटी पूर्ण करेल. तुमचे चॅनल पॉलिसी आणि गाईडलाईन्स फॉलो करतात की नाही हे यूट्यूब चेक करते. त्याशिवाय चॅनलला कमीत कमी 1000 Subscribers आणि 4000 वॅलिड public watch time असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे चॅनल लोकांनी कमीत-कमी 4000 तास पाहणे गरजेचे आहे.

त्यानंतर Gmail आईडीवरून Youtube वर लॉगइन करावे लागेल. सर्च बारच्या उजव्या बाजूला अकाउंट असते. त्याठिकाणी My Channel ऑप्शनवर क्लिक करून त्याला काही नाव द्यावे लागले. आपल्या चॅनलचे नाव ठेवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाव थोडेसे यूनिक ठेवा आणि आधी तुम्ही ठेवलेल्या नावाचे दुसरे कोणतेही चॅनल असता कामा नये. Youtube वर कमाई त्यावेळी सुरू होईल, जेव्हा तुम्ही त्याच्या ‘मॉनेटायजेशन’ प्रोग्रामसाठी अप्लाय कराल. अप्लायसाठी डाव्या बाजूला असलेल्या चॅनल सेक्शनमध्ये हा ऑप्शन दिसेल. यूट्यूबने मॉनेटायजेशन प्रोग्रामच्या नियमात केला आहे. तेथे क्लिक केल्यावर आपला ईमेल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर जवळपास दोन दिवसाने तुम्हाला अप्रुव्हल मिळेल.

ऍप्लिकेशनच्या प्रक्रियेमध्ये पैसे कमावण्यासाठी एक AdSense अकाउंट कनेक्ट करणे गरजेचे असते. त्यासाठी Sign up for Google AdSense वर क्लिक करा. जर आधीपासूनच हे अकाउंट असल्यास त्याचा वापर करू शकता. एका AdSense अकाउंटशी एकाहून अधिक चॅनलही लिंक करू शकता. जर AdSense नसेल, तर ऑन-स्क्रिन निर्देशांचे पालन करून बनवू शकता. एकदा AdSense ला कनेक्ट केल्यानंतर, तुमच्या Sign up for Google AdSense वर हिरव्या रंगाचा Done साईन मार्क केला जाईल. त्यानंतर तुमचं चॅनल रिव्ह्यू केले जाईल. Youtube चे ऑटोमेटेड सिस्टम आणि रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही गाईडलाईन्सचे पालन केले आहे की नाही हे पाहिले जाते. चॅनल रिव्ह्यू झाल्यानंतर एक महिन्याने, तुम्हाला निर्णय समजेल. चॅनलवर जाहिरातीद्वारे कमाई करता येते. डिस्प्ले आणि जाहिरातींमधून पैसे कमावू शकता. चॅनलच्या मेंबरशिपद्वारेही पैसे कमवता येतात. मेंबर्स तुमच्याकडून दिल्या जाण्याऱ्या काही खास फायद्यांसाठी मासिक पेमेंट देखील करतील.

Post: YouTube चॅनल सुरु करा अन् करा घरबसल्या ‘कमाई’, जाणून घ्या प्रक्रिया. Sejal Media News

Open chat
Hello,
Can we Help You ☺️